
पुणे : विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने वाकड, ताथवडे, पूनावळे आणि परिसरातील नागरिकांसाठी विशेष आधार दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी आपल्या आधार कार्डमधील त्रुटी दूर करून आवश्यक अद्ययावत करण्यासाठी याचा लाभ घेतला.
या शिबिरात नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर सुधारणा, तसेच बायोमेट्रिक अपडेट आणि नवीन आधार नोंदणी अशा महत्त्वपूर्ण सेवा पुरविण्यात आल्या. विशेषतः ज्या नागरिकांना वेळेअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे आधार अपडेट करणे कठीण जात होते, अशा नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.
विशालभाऊ वाकडकर यांनी सांगितले की, “आधार कार्डमध्ये अचूक माहिती असणे नागरिकांसाठी आवश्यक आहे. शासकीय आणि वित्तीय व्यवहारांमध्ये आधारचा मोठा उपयोग असल्याने, गरजू नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील.”
शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात अशाच सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने लवकरच आणखी समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
— विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशन वाकड, पिंपरी चिंचवड
(संपर्क: मोबाईल 8235909090
ई-मेल: wakadkarvishal21@gmail.com)