
तासगांव तालुका उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी आज अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पाठिंबा दिलाय..लोकसभेत शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना रोहित पाटील यांनी मदत केली नसल्याने यावेळी शिवसेना त्यांचं काम करणार नसल्याचे सांगत माने यांनी संजयकाकाना जाहीर पाठिंबा दिलाय..तर दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाप्रमुख महादेव पाटील यांचे कार्यकर्तेही संजयकाका यांचेच काम करताना दिसत आहेत..त्यामुळं शरद पवार राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांच्या अडचणीत भर पडलीय..
कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे सरकारांचा गट लोकसभेतील संजयकाका यांच्याशी असणारे सर्व मतभेद विसरून त्यांच्या प्रचारात जोमाने सक्रिय झालाय.. त्यामुळं कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही रोहित पाटील एकाकी पडले आहेत..नगरपालिकेत रोहित पाटील विरुद्ध ईतर सर्व असे चित्र होते..तरीही नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटील यांनी एकट्याच्या बळावर विजयश्री खेचून आणत आपले नेतृत्व सिद्ध केले होते..
तीन वर्षांपूर्वी झालेल्या कवठेमहांकाळ नगरपालिकेतील विजयाची पुनरावृत्ती करायची असेल तर रोहित पाटील यांना येणाऱ्या काळात साम दाम दंड भेद नीतीला पुरून उरत विरोधकांचा सामना करावा लागेल..आबा गटाकडे नेतृत्वाची दुसरी फळी म्हणावी अशी कार्यरत नाही..त्यात आबांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याबद्दल मतदारांमध्ये काहीशी नाराजी आहे.. आ.सुमनताई पाटील यांच्याकडे वक्तृत्वशैली नाही,शिवाय पायाच्या दुखण्याने त्यांना फिरण्यावर मर्यादा आहेत..त्यामुळं रोहित पाटील आणि बहीण स्मिता पाटील यांनाच लोकांपर्यंत पोहोचावे लागणार आहे..त्यातच तासगाव पैसे वाटप प्रकरणामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल किंचित खच्ची झाले आहे..२००४ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि आबांच्या कुटुंबातील उमेदवारांसमोर विधानसभेत तालुक्यातील तगडा उमेदवार समोर आहे..त्यामुळं रोहित पाटील यांना फक्त सहानुभूतीवर ही निवडणूक जिंकणे सोपे नाही..
विजयासाठी आबांच्या कुटुंबीयांना येणाऱ्या पंधरा दिवसांत खूप कष्ट घ्यावे लागतील..
रोहित यांची खासदार विशाल पाटील यांच्याशी जवळीक असल्याने पक्षाचे नेते जयंत पाटील कितपत मदत करतील याबद्दल साशंकता आहे..सध्यातरी रोहित यांच्यामागे खासदार विशाल पाटील ठामपणे उभा असले तरी त्यांचे या मतदारसंघात किती मतदान आहे हाही संशोधनाचा विषय आहे..त्यामुळं तासगांवचा गड कायम ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे शेवटच्या टप्प्यात बारामतीकरानाच पुढाकार घ्यावा लागेल असे वाटतंय..
(अजून एक ज्याप्रमाणे अजितदादांनी तासगावात येवून दिवंगत आबांवर टीका केल्याचे तासगांवकराना आवडलं नाही,त्याचप्रमाणे खासदार विशाल पाटील यांनीही तासगावात येवून संजयकाका यांना टार्गेट केल्याचं काहीना आवडत नाही हि वस्तुस्थिती आहे..)