
पुणे: मोशी प्रभागात नुकताच एक अनोखा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये पूर्णांगिनी, निराधार व महिला भगिनींना समाजात मान व सन्मान देण्यासाठी विविध उपक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्यावतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्देशी महिलांना ‘पूर्णांगिनी’ या विशेष नावाने समाजात मान्यता मिळवून त्यांना सन्मान प्रदान करणे होता. तसेच त्यांना त्यांच्या विचार व भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. महिलांना समाजात समान मान व सन्मान मिळावा, यासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या दरम्यान, विधवा व निराधार महिलांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि हळदीकुंकवाचा मान देण्यात आला. महिलांना अश्रुपूरित शब्दांत आपले अनुभव आणि विचार व्यक्त करतांना, कार्यक्रमाचा हृदयस्पर्शी क्षण निर्माण झाला.
या कार्यकमामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्यांना समाजात समर्पण आणि सन्मान मिळविण्याचा प्रेरणा मिळेल, अशा भावना कविता आल्हाट यांनी यावेळी व्यक्त केल्या.