
पुणे : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष, मराठ्यांचे क्रांतीसूर्य, आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्तिथीनिमित्याने, बोडकेवाडी येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनच्या पुणे जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले .
यावेळी सकाळी १० वाजता ह. भ. प. शिवाजी महाराज बोडके व सचिन लिमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर म्हणाले की, आण्णासाहेब जावळे पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजकारण केले, त्यांनी मराठा आरक्षणावर मोठ्या प्रमाणात लढा सुरु केला , जावळे पाटील यांनी कॉलेजच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक मोर्चे, आंदोलने केली. समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी अनेक युवा सहकारी जोडून त्यांना मार्गदर्शन केले. जावळे पाटील यांचे कार्य समाजासाठी मोठ्या प्रमाणात आहे, असे प्रतिपादन लिमकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके म्हणाले की , मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलने व मोर्चे बांधणी केली, आण्णासाहेब जावळे पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक सहकारी जोडून सामाजिक कार्य सुरू केले. अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठून समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जावळे पाटील यांनी प्रयत्न केले. असे प्रतिपादन अक्षय बोडके यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय कांबळे, गणेश वाघमारे व्यापारी आ.अध्यक्ष , अणसराज माने पश्चिम महाराष्ट्र सचिव , गणेश मिसाळ कामगार आ. पुणे जिल्हा, अण्णा खोबरे मुळशी तालुका अध्यक्ष, पांडुरंग बोडके, सुरज शेळके ,ज्ञानेश्वर बोडके , गोकुळ हसे, अदनाम शेख, सुरेश गवई, महेश माने,विमल कुमार चौधरी , सलीम शेख व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ह .भ. प. शिवाजी महाराज बोडके यांनी आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देऊन अभिवादन केले. आणि दिनांक २ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना मराठवाडा अध्यक्ष स्व. देवकर्ण वाघ यांना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.