
Views: 120
Read Time:1 Minute, 18 Second
पुणे: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ थेरगाव परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत संवाद साधला. चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी, ठीकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी अशा उल्हासित वातावरणात सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान पदयात्रेच्या माध्यमातून थेरगावकरांनी महायुतीच्या विजयासाठी ‘वज्रमूठ’ बांधली आहे.
यात्रेदरम्यान महिलांनी औक्षण करून विजयासाठी आशीर्वाद दिले. तरुणाईचा जोम, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन मिळाल्याने या पदयात्रेला विशेष ऊर्जा मिळाली. ग्रामस्थांच्या उत्साही प्रतिसादामुळे थेरगावमधील या पदयात्रेने मतदारसंघात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे.