
सातारा: बेलवडे हवेली (ता. कराड, जि. सातारा) येथील गरीब कुटुंबातील चार मुलींना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात आली. या मुलींना प्रत्येकी ५,००० रुपयांचे चेक देऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पाठबळ देण्यात आले.
मदत मिळालेल्या विद्यार्थीनींची नावे:
1. कु. शिवानी बाळासाहेब दडस – बी. फार्मसी, सातारा
2. कु. साक्षी बाळासाहेब दडस – बी.एससी, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, विद्यानगर
3. कु. वैष्णवी सुनील कचरे – इंजिनिअरिंग (ENTC), कराड
4. कु. साक्षी जगन्नाथ कोकरे – बी.बी.एस, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, विद्यानगर
परिस्थितीची जाणीव ठेवून मदत
शिवानी व साक्षी दडस यांच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांना अजून एक बहिण आहे, जी सध्या इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. साक्षी कोकरे हिच्या वडिलांना कंपनीतून कामावरून काढून टाकल्यामुळे तिच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वैष्णवी कचरे हिचे वडीलही गरीब कुटुंबातील आहेत. या परिस्थितीचा विचार करून ट्रस्टने पुढील शिक्षणासाठीही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या मदत वितरण कार्यक्रमाला प्रवीण काकडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), सतिश थोरात (कराड तालुका अध्यक्ष), तानाजी कचरे, युवराज कचरे, जगन्नाथ कोकरे व सुनील कोकरे यांची उपस्थिती होती.
शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने अशा गरजू विद्यार्थिनींना शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.