
पुणे: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त युगपुरुष स्फूर्ती स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जगातील प्रथम अश्वारूढ शिवस्मारकास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रथमच पोलीस बँड पथकाकडून मानवंदना देण्यात आली याप्रसंगी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी पुणे, समाजभूषण उत्तमराव उर्फ अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, शिवजयंती उत्सव समिती व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे सेक्रेटरी अजय दादा पाटील, संस्थापक अध्यक्ष अभियान प्रतिष्ठान महेश पवार, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष रवींद्र माळवदकर, शिवाजी मराठा सोसायटी सेक्रेटरी अण्णा साहेब थोरात , मराठा महासंघाचे बाळासाहेब अमराळे उदय जगताप ,मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कोंडे ,महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिलजी ताडगे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते,त्या नंतर आम्ही संभाजी ब्रिगेड ने लाल महाल येथे आयोजित केलेल्या दीप महोत्सव कार्यक्रमात उपस्थिती राहून राजमाता जिजाऊ माँसाहेब व बाल शिवाजी महाराज यांना वंदन केले,सदर कार्यक्रमाचे नियोजन संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष प्रशांत कुंजीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले या वेळी ऐकता योग ट्रस्ट चे नाना निवंगुणे उपस्थित होते,मराठा महासंघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रकाश सुपेकर, राहुल दुर्गे, पंकज घाडगे, गणेश कुंजीर,परशुराम पवार व असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते….