अनेकांना घडवणाऱ्या पुण्याला वैभवशाली वारसा डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे मत; सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ यशोगाथाचे प्रकाशन

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवापिढी वाचनासाठी पुस्तकांबरोबरच तंत्रज्ञानाचाही उपयोग करते. त्यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. संघर्षातूनच आयुष्य घडत असते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जात प्रगतीच्या दिशेने जात राहावे. सुनील देशमुख यांनी असाच जिद्दीने केलेला हा प्रवास इतरांसाठी प्रेरक राहील, अशी खात्री वाटते.”
सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. सिम्बायोसिस संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून मुजुमदार सरांकडून प्रेरणा घेतली. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रियांका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी देशमुख यांनी आभार मानले.