
पुणे: कसबा पेठ येथील श्री साई पालखी सोहळा समितीतर्फे महाशिवरात्र उत्सव सोहळा कार्यक्रम 2025 नुकताच उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच समितीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी समितीचे राजेंद्र अचलारे यांनी सपत्नीक श्री साईच्या पादुकांची महापूजा केली. यावेळी उपस्थित 11 महिलांनी लघुरुद्राभिषेक केला. श्री साईंच्या पादुकांना उसाच्या रसाचा व फळांच्या रसाचा महाअभिषेक करण्यात आला. समितीचे सुनील तांबे यांच्या हस्ते श्री साईंच्या पादुकांची महाआरती करण्यात आली.
सामाजिक उत्तरदायित्व म्हणून यावेळी समितीकडून वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतील मुलांसाठी सिलिंग फॅन व कुलर भेट देण्यात आले……..
महाशिवरात्रीनिमित्त मंडकी नदीतील अदभूत एका शिवलिंगात तीन शिवलिंग असलेले शाळीग्राम भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष किरण कदम, विश्वस्त सचिव मंदार शहाणे, खजिनदार महावीर क्षीरसागर, विश्वस्त सदस्य गुरुप्रसाद पगडे, विजय मेथे, संजय खरोटे, अरुण वीर, देविदास फडतरे, संजय पवळे उपस्थित होते.