
पुणे-“आपला म्युझिकल ग्रुप आणि भूगोल फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संगीताचा सुरेल नजराणा” आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.हनुमंत लांडगे नवनाथ कोलते पत्रकार सुरज साळवे ,राहुल लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटा हॉल), आकुर्डी येथे झालेल्या या सोहळ्यात मराठी आणि हिंदी गाण्यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संगीतप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय कार्यक्रम ठरला.नामवंत गायक श्री अनिल जी गायकवाड आणि आपला म्युझिकल ग्रुप चे कलाकार सुजाता माळवे, विहंग पातुरकर, दिलीप सांगळे,अरूण सरमाने, शुभांगी पवार, अनुराधा साळवी, आदिती कुलकर्णी, विशेष पुरस्कार चे मानकरी “श्रीमती छाया अय्यर,श्री रविंद्र शिंदे,” मल्लिकार्जुन बनसोडे,नेहा दंडवते, अनिल घाडगे या कलाकारांनी सादर केलेली सुरेल गाणी..कल्पना जगताप ह्यांच्या सुमधुर निवेदनाने उत्कृष्ट होत गेला.
पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या “आरंभ फाऊंडेशन, निसर्गराजा मित्र जिवांचे, अविरत श्रमदान संस्था,ECA, एनविराॅन फाऊंडेशन, आंघोळीची गोळी,ग्रीन आर्मी,निसर्ग सायकल मित्र,वारजे निसर्ग मित्र फाऊंडेशन, इंद्रायणी सेवा संघ, भूगोल फाऊंडेशन या संस्थांना शाल आणि सन्मानचिन्ह,देशी आयुर्वेदीक वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच आदर्श माता पुरस्कार ………..देण्यात आला व कलाकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्मिता विजयन “CEO of PBR Logistics “यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यात उद्योगपती नवनाथ कोलते,कामगार नेते हनुमंत लांडगे महाराष्ट्र प्रदेश भाजप कामगार संघटना,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज साळवे पुण्यनगरीचे पत्रकार राहुल लिमये यांचा मोलाचा वाटा होता.दत्तात्रय राठोड, पांडुरंग वाळुंज पाटील, नेताजी पाटील, राजेंद्र शिंदे,सचिन शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले. रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दाद मान्यवर उपस्थिती आणि या सोहळ्याचे प्रमुख आयोजक श्री. अनिल घाडगे व सौ. नेहा दंडवते, सहआयोजक श्री. दिलीप सांगळे व सौ. शुभांगी पवार होते. तसेच भूगोल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विठ्ठल नाना वाळूंज यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाने वेगळेच रंगतदार रूप घेतले.या सोहळ्यासाठी तांत्रिक बाजू साऊंड शैलेश घावटे, टेक्निकल टीम: ए.के. क्रिएशन्स, व्हिडिओग्राफी सौमिल घावटे, फोटोग्राफी आकाश गाजुल
हा संगीतमय सोहळा उपस्थित रसिक आणि पर्यावरण प्रेमींना आनंद देणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.