
Views: 82
Read Time:1 Minute, 15 Second
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात ८ मार्च २०२५ रोजी जर्मन भाषा विषयातील व्यावसायिक संधींवर विशेष मेळावा आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात पुणे परिसरातील जर्मन कंपन्या, जर्मन भाषा प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या मेळाव्याचा प्रमुख आकर्षणबिंदू म्हणजे “Job Wall” संकल्पना, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. कार्यक्रमात जवळपास २० नामांकित कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती जर्मन भाषा समन्वयक डॉ. स्वाती आचार्य यांनी दिली आहे.
हा मेळावा जर्मन भाषा शिकणाऱ्या आणि त्यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.