
पुणे – पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला मंच आणि कामगार कल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या जल्लोषात पार पडला. या भव्य कार्यक्रमाला महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने पुणे महानगरपालिकेतील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला अर्ध्या दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर करण्यात आली. ‘महिला शक्ती फुलवंती’, महाराष्ट्रातील सण, मराठी व हिंदी गीते तसेच ‘सावित्री मिक्स’ यांसारख्या विषयांवर आकर्षक नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सर्व महिला अत्यंत आनंदी आणि उत्साहात कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या.
या विशेष दिवसाचे औचित्य साधून उपस्थित महिलांनी प्रशासनाचे आभार मानले आणि हा दिवस संस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली.