
पुणे: शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर सभागृह, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज, डेक्कन, पुणे-४ येथे दुपारी २ ते ५ या वेळेत संपत्र होणाऱ्या वर्धापन दिन समारंभात हा पुरस्कार प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. डॉ. बाबा आढाव गेली ७५ वर्षे झाली, महाराष्ट्रातील दिन दुबळ्यांची आपल्या विविध संस्थेच्या माध्यमातून सेवा प्रदान करीत आहेत, त्यांच्या या अलौकीक कर्तत्वास सलाम म्हणून राष्ट्रसेवा परिषद, पुणे त्यांचा हा विशेष सन्मान करीत आहे. राष्ट्रसेवा परिषद गेली ३८ वर्षे, पुणे परीसर व उर्वरीत महाराष्ट्रात निरपेक्षपणे सेवा करीत आहे. मराठबोली पुणे ही संस्थाही राष्ट्रसेवा परिषदेशी संलग्न संस्था असून, ती संस्थाही मराठी साहित्यविश्वासाठी निरपेक्षबुद्धीने कार्य करीत आहे.
या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आजपर्यंत जवळ जवळ २००० समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला असून, मराठबोलीचा दिवाळी अंक निशुल्क असून ही ही एक कौतुकास्पद बाब आहे.
राष्ट्रसेवा परिषदेने १९९३ च्या किल्लारी भूकंपात मिलेटरी बरोबर ३६ लोकांचा ग्रुप घेऊन सतत तीन दिवस अहोरात्र लोकसेवा केली आहे. त्याबरोबरच आण्णा हजारे आंदोलन व इतर अनेक जनआंदोलनात तीने आपला सातत्याने सहभाग दर्शविला आहे. शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ च्या कार्यक्रमात खालील ७४ लोकांचा दोन्ही संस्थानांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. सदर प्रसंगी जवळ जवळ १८ विविध सामाजिक, सांस्कृतिक साहित्यीक व कलात्मक पुरस्करांच्या माध्यमातून ७४ जनांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. सदर सन्मानार्थी महाराष्ट्राच्या विविध भागातून सदर प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे सर्व पुरस्कार मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
सदर प्रसंगी, परमेश्वर उमरदंड, शिवाजी कृतपकर, तेजस्वी आमले, साहेबराव पवळे, रजनी धोंगडे, प्रिया खैरे पाटील, शरद आहे,
सचिन कुरकुटे, हेमंत परब, वैशाली गावंडे, श्रीपाद टेंबे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महात्मा पुरस्कार डॉ. बाबा आढाव
महाकवी पुरस्कार प्रा. प्रशांत मोरे, ऋचा कर्वे, शाम ठक
समाजमहर्षी पुरस्कार – पंढरीनाथ पाटील, विजय गाडगे, अगंद पाटील, कै. पुरूषोत्तम बुधोडकर
आदर्श शिक्षक पुरस्कार-शमीम इनामदार, मनिषा देवरे, सुजाता बोच्हाडे, ज्ञानोबा गायकवाड, संजय सुपे, सुवर्णा गाडीलकर,
प्राजक्ता नेटके, लता पाडेकर, पांडुरंग देवडे, प्रविण खोलंबे, संदिप शिंदे, साधना सांडभोर जाधव, मंगल नवले समाजभूषण पुरस्कार – बाळासाहेब औटी, संजय नलावडे, निलेश पवार, बाळासाहेब खरात, रविंद्र औटी, निवृत्ती आलगुले, बिभिषण हेलाले, गोविंद कठारे, सुधाकर चिलमे, वसंत ढोले, संगीता चलवाड, बालाजी डोंगरे, हरीराम पवार, रत्ना पवळे लोकसाहित्यिक पुरस्कार वैशाली गावंडे, प्रिया खैरे पाटील, ऋतुजा गायकवाड, भाऊसाहेब आढाव, आकांक्षा कोलते, सचिन
कुरकुटे, सुनिता कपाळे, अवंतिका महाडीक
लोककवी पुरस्कार – कुसुम बोते, सौरभ आहेर, प्रताप गुंजाळ, सुनिता चौधरी
आदर्श सामाजिक संस्था काव्यवाणी खडकी, सहयोग विशेष मुलांची शाळा, राजगुरूनगर, सुडे यांची संस्था, बुधोडा, संकल्प
सामाजिक प्रतिष्ठान कर्वेनगर, नंदादीप पाळणाघर, कर्वेनगर
आदर्श शिक्षण संस्था आरंभ प्रि प्रायमरी स्कूल, औसा, जि. लातूर
शांतीब्रम्ह पुरस्कार – शरद अत्रे, सोपान पवळे, रामचंद्र तर्कसे, कै. रामचंद्र सोनवणे
परमार्थ केसरी पुरस्कार- जनार्दन चलवाड, बुधोडा
मुक्तात्मा पुरस्कार- हरी कोलपाक
संत सावतामाळी पुरस्कार- तुकाराम चलवाड
आदर्श नागरीक पुरस्कार मल्लिकार्जुन मिटकरी, भिमा आलगुले
साहित्यभूषण पुरस्कार- डॉ. सुनिल पवार
युवाक्रिडा विशेष नैपुण्य पुरस्कार विवान चक्के, श्रवण राक्षे
प्रभूरत्नाई पुरस्कार – घटरिकामा, पासंग, ममता पैलवान, प्राक्तन, चंदनदाह, मोठा माणूस, सगळ उलथवून टाकलं पाहिजे.