
पुणे: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस दक्षिण भारतीय सेलच्या वतीने आयोजित सभेत कर्नाटक राज्याचे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी हजेरी लावली. जॉर्ज यांनी पिंपरीतील दक्षिण भारतीय समाज सुलक्षणा शिलवंत यांच्याशी खंबीरपणे उभा राहील, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
जॉर्ज यांनी शिलवंत यांच्या ऊर्जावान आणि कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुक केले. जागरूक मतदार नक्कीच त्यांना निवडून देतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी निवडणुकीनंतर शहरात येऊन शुभेच्छा देण्याचे वचन दिले.
यावेळी, डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी दक्षिण भारतीय समाजाचे शहराच्या विकासात योगदान असल्याचे गौरवले आणि या समाजाचा पाठींबा हे आपले भाग्य असल्याचे सांगितले. शहराच्या चौफेर विकासासाठी एकत्र येऊन विजय साधण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.