Skip to content
May 12, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Reporter News

Reporter News

Today's News Tomorrow's Future

Primary Menu
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Live
  • Home
  • हिरकणी रन- वुमेन्स हाफ मॅरेथॉन सुरक्षा, सक्षमीकरण व आत्मनिर्भरतेसाठी धावल्या हजारो ‘हिरकणी’
  • Marathi News

हिरकणी रन- वुमेन्स हाफ मॅरेथॉन सुरक्षा, सक्षमीकरण व आत्मनिर्भरतेसाठी धावल्या हजारो ‘हिरकणी’

admin April 6, 2025
हिरकणी रन- वुमेन्स हाफ मॅरेथॉन     सुरक्षा, सक्षमीकरण व आत्मनिर्भरतेसाठी धावल्या हजारो ‘हिरकणी’
Views: 270
2 0
Spread the love
           

Read Time:3 Minute, 56 Second

पुणे: महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम व आत्मनिर्भर व्हावी, त्यांच्यामध्ये फिटनेसचे महत्व वाढावे, या उद्देशाने हजारो ‘हिरकणी’ रविवारी पुण्याच्या रस्त्यावर धावल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या टीमने महिलांना प्रोत्साहन दिले. ‘आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत’, असा संदेश महिलांनी यावेळी दिला.

 

साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या ‘हिरकणी रन’, वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पुण्यासह राज्यातील विविध शहरातून व गावांतून १२०० पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. बाबुराव सणस मैदान, सारसबागपासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. तीन, पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा चार प्रकारात झालेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

 

यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह ‘मुक्ताई’चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता अजय पुरस्कार, तेजस बर्वे, अभिनेत्री नेहा नाईक, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सुरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर, कॅप्टन पूजा  मेहरा, निशा पाचंगे, स्मिता भिसे, विपुल शर्मा आदी उपस्थित होते.

 

सोनाली कुलकर्णी म्हणाली, “राज्यभरातून धावण्यासाठी आलेल्या ‘हिरकणीं’चा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मुली, महिलांनी एकमेकींना सशक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले स्वास्थ्य चांगले व तंदुरुस्त असायला हवे. त्यासाठी व्यायाम, डायट याचा समतोल राखला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक कर्तृत्ववान महिलांकडून प्रेरणा घ्यावी. शारीरिक, मानसिक व आर्थिक सशक्त झालो, तर आपण देशासाठी, समाजासाठी चांगले योगदान देऊ शकतो.”

 

सुरज लोखंडे म्हणाले, “हजारो महिलांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पुण्यातील महिला सुरक्षित व सक्षम असल्याचे दाखवून दिले. या मॅरेथॉनमधुन उभा राहणाऱ्या निधीचा विनियोग अनाथ व दिव्यांग मुलांच्या संस्थांसाठी करण्यात येणार आहे. साई जनसेवा प्रतिष्ठान नेहमीच जनतेच्या हिताचे उपक्रम राबवत असते. ‘हिरकणी रन’ ही मॅरेथॉन यापुढे दरवर्षी घेतली जाणार आहे.”

 

अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर यांची महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी झालेल्या झुंबा नृत्याने उपस्थित महिलांमध्ये उत्साह संचारला होता. सहभागी सर्व धावपटूंना प्रमाणपत्र, मेडल, टीशर्ट व नाश्ता देण्यात आला. विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. सणस मैदान, दांडेकर पूल, सिंहगड रोड, राजाराम पूल, संतोष हॉल ते सणस मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग होता.

Share

Pinterest
LinkedIn
Avatar

About Post Author

admin

https://reportertodaynews.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %

Spread the love
           

Continue Reading

Previous: पिंपरी-चिंचवड: भोसरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार लाच घेऊन पळून जाताना अटक
Next: गावे ‘भारत’ आणि शहरे ‘इंडिया’ हा फरक बदलण्याची गरज; ग्रामसंवाद मेळाव्यातील सुर

Related Stories

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025
2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • Marathi News

2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)

admin May 11, 2025

Recent Posts

  • महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • 2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील
  • संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले – किरण माने

Recent Comments

  1. FloydLex on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  2. Edgarduh on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  3. Trefipt on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  4. Diplomi_aiMl on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  5. RobertRox on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • Bangali News
  • Contact Us
  • Defence News
  • English News
  • Hindi News
  • Kannada News
  • Marathi News
  • Uncategorized

You may have missed

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025
2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • Marathi News

2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)

admin May 11, 2025
देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील
  • Marathi News

देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील

admin May 10, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.