
पुणे : 13 एप्रिल 2025 भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्व संध्येला निमंत्रितांचे काव्यसंमेलन झाले.याप्रसंगीपहिल्या विश्व काव्यसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रतिभावंत कार्यकर्त्यांनामार्गदर्शन केले.संविधानाचे आचरण जास्तीत जास्त प्रमाणात कसे होईल यासाठीसर्वांनी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन डाॅ.घाणेकर यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे आयोजन तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांनी केले.
याप्रसंगी झालेल्या निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यासह राहुल भोसले, मधुकर्णिका सारिका सासवडे, सुनील जोशी दीपाराणी गोसावी,नंदकिशोर गावडे आदिंनी आपल्या काव्यातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.समारोपात भारतीय जनता पार्टी, ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या महिला कार्याध्यक्ष भारती महाडिक यांच्या शुभहस्ते डाॅ.घाणेकर संपादित डहाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजन अजया मुळीक आणि माधुरी भागवत यांनी केले. प्रिया दामले यांनी आभार मानले.