Skip to content
May 12, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Reporter News

Reporter News

Today's News Tomorrow's Future

Primary Menu
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Live
  • Home
  • १ हजार कोटींच्या व्हीआयपीएस ग्रुप पॉन्झी घोटाळ्यातील विनोद खुटे आणि सहकाऱ्यांना तातडीने अटक करावी
  • Uncategorized

१ हजार कोटींच्या व्हीआयपीएस ग्रुप पॉन्झी घोटाळ्यातील विनोद खुटे आणि सहकाऱ्यांना तातडीने अटक करावी

admin April 28, 2025
१ हजार कोटींच्या व्हीआयपीएस ग्रुप पॉन्झी घोटाळ्यातील विनोद खुटे आणि सहकाऱ्यांना तातडीने अटक करावी
Views: 442
0 0
Spread the love
           

Read Time:11 Minute, 57 Second

पुणे: व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज, ग्लोबल अॅफिलिएट बिझनेस, काना कॅपिटल लिमिटेड आणि त्यांचा मास्टरमाइंड विनोद खुटे याने फसवलेल्या हजारो पीडितांच्या वतीने, आम्ही माध्यमांना संबोधित करत आहोत. आम्ही गुन्हेगारांच्या अटकेसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी करत आहोत. तसेच, पीडितांसाठी लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट विकास शिंदे यांच्यावरील कायदेशीर आधार घेऊन दाखल खोट्या केसेसचा निषेध करत आहोत.

 

२०२० पासून, विनोद खुटे याने संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण अनारसे आणि अजिंक्य बडदे यांच्यासह मिळून, कायदेशीर व्यवसायाच्या नावाखाली पॉन्झी योजना आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM) फसवणूक केली. व्हीआयपीएसवॉलेट प्रा. लि., व्हीआयपीएसट्रेड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, डी धनश्री मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी आणि दुबई-स्थित काना कॅपिटल यांच्या माध्यमातून त्यांनी फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी आणि शेअर गुंतवणुकीवर २-४% मासिक परताव्याचे खोटे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केले.

 

भारतभरातून १००० कोटींहून अधिक रुपये गोळा करण्यात आले आहेत, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह ओडिसा या राज्यांमधील लोकांची यामध्ये गुंतवणूक आहे. ईडीच्या प्राथमिक तपासानुसार हा आकडा कमी असला तरी १००० कोटींपेक्षा कमी नाही. हे पैसे हवाला मार्गे, शेल कंपन्या आणि क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजद्वारे दुबईला हस्तांतरित करण्यात आले, ज्यामुळे पीडितांचे आर्थिक नुकसान झाले.

 

खेड्यातील मोलमजूरी करणारे लोक, शेतकरी, नोकरदार, निवृत्तीवेतनधारक आणि छोटे गुंतवणूकदार यांसारख्या पीडितांनी व्हीआयपीएस ग्रुपच्या चकचकीत मार्केटिंग आणि ग्लोबल अॅफिलिएट बिझनेसच्या मोबाइल अॅपवर विश्वास ठेवला. अनेकांनी आयुष्यभराची बचत गुंतवली, कर्ज काढून, अनेक महिलांनी अक्षरशः सोनं घहाण ठेवून गुंतवणूक केली, परंतु परतावा मिळाला नाही आणि त्यांचे भांडवल गमावले. यामुळे पीडितांच्या कुटुंबांवर आर्थिक आणि भावनिक आघात झाला आहे. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेकांनी तसे प्रयत्न केले आहेत.

 

महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून आम्ही पोलिसांना खुटे आणि त्याचे सहकारी लोकांना फसवत आहेत याबाबत कल्पना देत होतो. पण पोलिसांनी लक्ष दिले नाही. जानेवारी २०२२ मध्ये बार्शीच्या विशाल फटेचे प्रकरण घडले. तो फटे आणि हा खुटे दोघांच्या स्किम सारख्याच होत्या. फटे फरार होता, तो १७ जानेवारी २०२२ ला पोलिसांसमोर हजर झाला (प्रकटला) त्याला अटक करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ जानेवारी २०२२ रोजी विनोद खुटे हा दुबईला राजरोसपणे निघून गेला (सटकला). फटे प्रकटला आणि खुटे सटकला असा प्रकार घडला. त्यानंतर त्याने भारतातील त्याच्याकडे असलेले लोकांचे सर्वच्या सर्व पैसे दुबईला हवाला मार्फत नेले.

 

ईडी तसेच आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत:

तपास- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे येथील फसवणूक, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीच्या FIR (गुर नं. ६५०/२०२३) च्या आधारे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) अंतर्गत ईडीचा तपास सुरू आहे. तसेच पुणे पोलीसांची आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offence Wing) MPID कायद्यानुसार तपास करत आहे.

जप्ती: मार्च २०२४: दुबईतील रु ३७.५० कोटींच्या मालमत्ता जप्त.

एप्रिल २०२४: रु २४.४१ कोटींच्या जंगम मालमत्ता (बँक खाती आणि ठेवी) आणि ८.९८ कोटींच्या स्थावर मालमत्ता (पुण्यातील फ्लॅट्स, हॉल, कार्यालये आणि अहमदनगरमधील जमीन) अशी एकूण रु. ७० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.

मे-जून २०२३ मध्ये पुणे, अहमदनगर आणि अहमदाबाद येथे छापे, १८.५४ कोटी रोख आणि बँक शिल्लक जप्त.

FIR: ऑक्टोबर २०२३ मध्ये व्हीआयपीएस ग्रुपविरुद्ध १०० कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासाठी FIR दाखल. FIR दाखल झाला तेव्हा खुटेचे सहकारी भारतात होते, दुसऱ्याच दिवशी ते नेपाळ मार्गे दुबईला गेले.

 

या सर्व प्रयत्नांनंतरही, विनोद खुटे फरार आहे आणि तो दुबईत लपला आहे. त्याला अंडरवर्ल्डशी संबंध असल्याने तो न्यायापासून पळत आहे. अजूनही नवनवीन स्किम आणून ॲानलाईन मिटींग्ज घेऊन कायद्याची आणि तपास यंत्रणांची गंभीर चेष्टा करत आहे. पोलिसांकडे गेलात तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही अशा धमक्या उघडपणे देत आहे. तपास यंत्रणा मात्र या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरल्या आहेत. FIR दाखल होऊन २ वर्षे झाल्यानंतर आज पहिल्यांदा या केसमधील पिडीत समोर येऊन बोलत आहेत. कालच २५-३० पीडितांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब दिला आहे. आजही महाराष्ट्रात खुटेचे लोक एजन्ट म्हणून काम करत आहेत. त्यामध्ये अकलूज येथे इम्रान चौधरी आणि नासिर चौधरी हे Bulls Capital नावाने स्कीम राबवत आहेत व विनोद खुटे याला हवाला मार्फत आर्थिक पाठबळ देत आहेत.

 

मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट विकास शिंदे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासून परिश्रम घेत आहेत. या घोटाळ्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ बनवले आणि अपलोड केले, ज्यात विनोद खुटे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या फसव्या कृत्यांचा पर्दाफाश केला. प्रत्युत्तरात, खुटे याने दुबईतून अॅडव्होकेट शिंदे यांना बदनामीची कायदेशीर नोटीस पाठवली आणि ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. अॅडव्होकेट शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हवाला देत या नोटीसीला सविस्तर उत्तर दिले.

 

आता, खुटे याने अॅडव्होकेट शिंदे यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानी आणि मनाई आदेशासाठी पुणे कोर्टात सिव्हिल दावा दाखल केला आहे. ही कारवाई न्यायाच्या मार्गात गंभीर धोका आहे आणि सत्य दडपण्याचा आणि पीडितांसाठी लढणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे. पीडित म्हणून आम्ही या कायदेशीर छळाचा तीव्र निषेध करतो आणि अॅडव्होकेट शिंदे यांच्यासोबत एकजुटीने उभे आहोत.

 

या प्रकरणातील फसवणुक झालेल्या पिडीतांच्या वतीने आम्ही खालील मागण्या करतो:

1 विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण अनारसे आणि अजिंक्य बडदे व आजही महाराष्ट्रात राहून खुटेचे हस्तक, एजंट म्हणून त्याच्यासाठी काम करणा-यांना ताबडतोब अटक करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. खुटे दुबईतूनही दुसरीकडे पळण्याच्या तयारीत आहे. खुटे याला भारतात आणण्यासाठी दुबई प्रशासनाशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करावी.

2 ईडी आणि इतर यंत्रणांनी १००० कोटींहून अधिक हस्तांतरित निधी शोधून पीडितांना त्यांची गुंतवणूक परत मिळवून द्यावी.

3 न्यायासाठी लढणा-या अॅडव्होकेट विकास शिंदे यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावीत. विनोद खुटेचा ॲानलाईन सुरु असलेला फ्रॅाड थांबवावा.

4 MLM योजना, क्रिप्टोकरन्सी व्यवहार आणि परदेशी आर्थिक हालचालींवर कठोर नियंत्रण लागू करावे, जेणेकरून अशा घोटाळ्यांना आळा बसेल. अशा गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गुन्हा घडून गेल्यानंतर मग कारवाई करण्यापेक्षा, गुन्हा घडत असतानाच थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

आम्ही माध्यमांना आमचा आवाज यंत्रणा, समाजापर्यंत पोहोचवण्याचे, पीडितांची व्यथा अधोरेखित करण्याचे आणि अॅडव्होकेट विकास शिंदे यांच्यावरील धमकीच्या कारवायांचा पर्दाफाश करण्याचे आवाहन करतो. व्हीआयपीएस ग्रुप घोटाळा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर विश्वासघात आहे ज्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आम्ही ईडी, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारला या प्रकरणाला प्राधान्य देण्याचे, सर्व गुन्हेगारांना अटक करण्याचे, अॅडव्होकेट शिंदे यांचे संरक्षण करण्याचे आणि विलंब न करता न्याय देण्याचे आवाहन करतो.

 

 

Share

Pinterest
LinkedIn
Avatar

About Post Author

admin

https://reportertodaynews.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %

Spread the love
           

Continue Reading

Previous: “समाज भूषण” पुरस्काराने गायिका सुरेखा कुलाळ यांचा गौरव
Next: आदिवासी मुलींचा किल्ले शिवनेरी ते वर्षा बंगला, मुंबई लॉंगमार्च 1 मे महाराष्ट्र दिनी सुरू होणार

Related Stories

अहिल्यादेवी ट्रस्टचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी – आयपीएस बिरदेव डोणे यांचे गौरवोद्गार
  • Uncategorized

अहिल्यादेवी ट्रस्टचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी – आयपीएस बिरदेव डोणे यांचे गौरवोद्गार

admin April 29, 2025
पुणे में नकली नोटों के रैकेट का भंडाफोड़; 28 लाख रुपये की नकली करेंसी के साथ पांच आरोपी गिरफ्तार
  • Uncategorized

पुणे में नकली नोटों के रैकेट का भंडाफोड़; 28 लाख रुपये की नकली करेंसी के साथ पांच आरोपी गिरफ्तार

admin April 28, 2025
आदिवासी मुलींचा किल्ले शिवनेरी ते वर्षा बंगला, मुंबई लॉंगमार्च 1 मे महाराष्ट्र दिनी सुरू होणार
  • Uncategorized

आदिवासी मुलींचा किल्ले शिवनेरी ते वर्षा बंगला, मुंबई लॉंगमार्च 1 मे महाराष्ट्र दिनी सुरू होणार

admin April 28, 2025

Recent Posts

  • महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • 2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील
  • संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले – किरण माने

Recent Comments

  1. FloydLex on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  2. Edgarduh on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  3. Trefipt on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  4. Diplomi_aiMl on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  5. RobertRox on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • Bangali News
  • Contact Us
  • Defence News
  • English News
  • Hindi News
  • Kannada News
  • Marathi News
  • Uncategorized

You may have missed

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025
2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • Marathi News

2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)

admin May 11, 2025
देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील
  • Marathi News

देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील

admin May 10, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.