
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ एकाच छताखाली घेता यावा याकरिता सोमवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० ते ५ यावेळेमध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात परंतु बऱ्याच नागरिकांना या योजनांची माहिती नसते तसेच नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना अश्या योजनाचा थेट लाभ मिळण्याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासन आपल्या दारी उपक्रमा दरम्यान शहरातील विधवा, अपंग व निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती,पॅन कार्ड नोंदणी व दुरुस्ती, पास पोर्ट, शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) ई श्रम कार्ड, मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती,प्रधानमंत्री किसान योजना, सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र,शॉप अॅक्ट परवाना, उद्यम आधार कार्ड,हयातीचा दाखला तसेच 70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड या सुविधा देण्यात येणार आहे.
सोमवार दिनांक ५ मी रोजी सकाळी १० ते ५ यावेळेमध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन श्री संदीप वाघेरे जनसंपर्क कार्यालय येथे होणार असून अधिक माहितीसाठी ९६७३४९४१४९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.