
पुणे: जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून संस्कार भारती, पश्चिम प्रांत, पिंपरी चिंचवड समितीची नृत्य विधा व कलाश्री नृत्य शाळा यांच्या सहकार्याने ‘हम करे राष्ट्र आराधन’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. या निमित्ताने संघाच्या गीतांवरती भरतनाट्यम, कथक, ओडिसी या सारख्या शास्त्रीय नृत्य शैलीतून नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध कथक जेष्ठ नृत्यगुरु शमाताई भाटे, डॉ.डी.वाय पाटील महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जेष्ठ कथक गुरु आणि संस्कार भारती पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष डॉ श्री.नंदकिशोर कपोते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ श्री. प्रवीणजी धबडघाव, संस्कार भारती क्षेत्र प्रमुख श्री चंद्रकांतजी घरोटे, कलधरोहर केंद्रीय टोळी सदस्य आणि प्रांत संयोजिका सौ. विनीताताई देशपांडे तसेच प्रांत महामंत्री श्री. प्रशांतजी कुलकर्णी, प्रांत उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई बाग, पिंपरी चिंचवड समिती उपाध्यक्ष सौ. वरदाताई वैशंपायन, श्री. प्रफुल्ल जी भिष्णूरकर श्री. नरेंद्र जी आमले, सचिव सौ. लीनाताई आढाव, सहसचिव सौ. आसावरीताई बर्वे, कलाश्री नृत्य शाळेच्या संचालिका आणि नृत्यविधेच्या संयोजिका सौ. सायली काणे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. प्रविणजी धबडघाव यांनी या संकल्पनेचं कौतुक केले. संघ गीतावर एक स्तुत्य उपक्रम केला आहे, पिंपरी चिंचवड समितीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. डॉ. एन जे पवार यांनी हा आपला सांस्कृतिक वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्या साठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि यशस्वी करू असा विचार मांडला. तर नृत्यगुरू शमाताई भाटे यांनी भारतीय नृत्यप्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्तुत कराव्यात अशी मनिषा व्यक्त केली. चित्रकला विधा सहसंयोजक श्री. रमेश खडबडे यांनी सर्व पाहुण्यांची व्यक्तीचित्रे रेखाटून त्यांना भेट दिली.
पिंपरी चिंचवड मध्ये कार्यरत असणाऱ्या दहा नामांकित नृत्य संस्थांचे नृत्य सादरीकरण यावेळी झाले. 1) रुख्मिणीदेवी कलाक्षेत्र -है वही पुरूषार्थी जो संघ पथ चालता रहे
2) वर्णिका नृत्यालय – अनेकता मे ऐक्य मंत्र
3) कलाक्षेत्रम नृत्यालय – जागो तो एक बार हिंदू जागो तो
4) भ्रमरी नृत्यालय – संघटन गढे चलो
5) कलाश्री नृत्यशाळा – चरैवेती चरैवेती यही तो मंत्र है
6) तालरंग – आज श्रद्धा सुमन अर्पित
7) नृत्योपासना भरतनाट्यम नृत्यालय – ले चले हम राष्ट्र नौका को भवर से पार कर
8) नटेश्वर नृत्य अकॅडमी -मुक्त हो गगन सदा
9) नृत्यमंजिरी कला केंद्र – हिंदू हिंदू एक रहे
10) नंदकिशोर कल्चरल सोसायटी – हे जन्मभूमी भारत.
या प्रसंगी सर्व नृत्य गुरूंचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य विधा वाचक मैफिल संयोजन सौ. प्रणिताताई बोबडे यांनी केले आणि नृत्य मासिक सभा संयोजक स्वप्ना रत्नाळीकर यांनी आभारप्रदर्शन केले.
समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संयोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संघ गीतावरील नृत्य सादरीकरण खूप सुंदर उपक्रम तसेच ही जुनी गाणी पुन्हा ऐकायला मिळाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.