
Views: 76
Read Time:1 Minute, 9 Second
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातील फ्रेंच विभागाने शनिवार, २४ मे रोजी “फ्रेंच ओपन डे २०२५” चे यशस्वी आयोजन केले. भारतातील फ्रेंच शिक्षणाच्या सर्वात जुना आणि प्रतिष्ठित केंद्रांपैकी एक असलेल्या या विभागात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत माहितीपूर्ण आणि अनुभवाधारित कार्यक्रम ठरला.
हा ओपन डे कार्यक्रम विद्यार्थ्यांना विशेषतः 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण आणि त्यांच्या पालकांना थेट प्राध्यापकांशी संवाद साधण्याची संधी देणारा ठरला. अभ्यासक्रमांची माहिती, शिकवण्याची पद्धत आणि नोंदणी प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष मदत यामुळे उपस्थितांना उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.