
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाचा आणि कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही —-पोलीस इन्स्पेक्टर श्री महेंद्र जगताप साहेब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले याप्रसंगी अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कराड तालुका पोलीस स्टेशन मधील नऊ कर्तबगार महिला अधिकारी यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री जगताप साहेब म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली आज ही त्यांच्या विचारानुसार आदर्श नुसार या देशांमध्ये कारभार सुरू आहे अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे नेतृत्वगुण मुत्सद्दीपणा ज्ञानलालसा झुंज घेण्याचा खंबीरपणा प्रजा हित तर अचूक न्याय गुण संरक्षण व्यवस्था गुप्तहेर खाते स्वाभिमान राज्यकारभाराची जाण रण कौशल्य बाणेदार वृत्ती साधी राणी आणि कल्याणकारी विचारसरणी अनेक सदगुण असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर . त्यांचे दान धर्म चा सामाजिक कार्याचा वसा व वारसा अखंडपणे चालू आहे हुंडा पध्दत बंद ही त्यांची संकल्पना मांडली आहे. या प्रसंगी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन अहिल्या रत्न पुरस्कार सहायक पोलिस निरीक्षक तब्बसुम शादीवान जयश्री वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा आमले पीएसआय रेखा देशपांडे पीएसआय शीतल पाटील पीएसआय शितल माने पोलीस ट्राफिक सोनम पाटील निर्भय पथकाच्या दिपाली पाटील यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे एपीआय बिराजदार साहेब कराडचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासो गावडे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य प्राचार्य उत्तमराव गलांडे कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात विश्वास चौगुले बाबासो काकडे अवधुत पाटील मंदार कदमसुरेश काकडे अर्जुन राव चव्हाण इत्यादी उपस्थित होते