
पुणे: चिंचवड सायन्स पार्क व तारांगणामध्ये आयोजित विश्व पर्यावरण दिवस २०२५ निमित्त दि. ०५ ते ०८ जून २०२५ दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले व याद्वारा पर्यावरण संवर्धनासाठी त्या अनुषंगाने जनसामान्यांमध्ये जागृती वाढीस लागावी या हेतूने रोजी वृक्षारोपण, पृथ्वीवरील वातावरण व पर्यावरण विज्ञान खुली प्रश्नमंजूषा स्पर्धा, श्री. उमेश वाघेला, पक्षीतज्ञ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वृक्ष ओळख कार्यक्रम व विश्व पर्यावरण दिवस २०२५ ची थीम Beat Plastic Pollution या विषयावर चित्रकला स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृती सप्ताहा दरम्यान एकूण ३५० विद्यार्थी व प्रेक्षकांनी तसेच उपमहानिदेशक, केंद्रीय राखीव सुरक्षा बल, तळेगाव यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ९० विद्यार्थी व सुरक्षाबल जवान यांनी कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला.
अशा कार्यक्रमांद्वारा तसेच पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण च्या माध्यमातून पर्यावरण जागृती लक्षी विविध उपक्रमांचे आयोजन सायन्स पार्कचे संस्थापक संचालक श्री. प्रवीण तुपे तसेच मा. अध्यक्ष, सायन्स पार्क तथा मा. आयुक्त, पिं.चिं.मनपा यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत राबविण्यात येतात.
तरी, अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी, शिक्षक व जनसामान्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खमपरिया यांनी केलेले आहे.