
पुणे: लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्थेचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. पतसंस्थेचा दिनांक ०६ जुन, २००३ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या लक्ष्मीनगर पतसंस्थेचा २२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पतसंस्थेच कामकाज २७ लाखांच्या खेळत्या भांडवलावर सुरु झालेल्या संस्थेने आज २४ कोटींच्या ठेवी व १८ कोटींचे कर्ज वाटप करून ४५ कोटींकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. पतसंस्थेच्या स्थापनेपासुन संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ असुन थकबाकी नाममात्र आहे. संस्थेच्या वतीने मानाचा सहकार भुषण पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मा. शशिकांत ऊर्फ बबनराव खंडु झिंझुर्डे यांना देण्यात आला.
पतसंस्थेच्या वाढीचा आलखे पाहुन व कामकाजाचा आढावा घेवुन त्यांनी संस्थेची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या वतीने समाजभुषण पुरस्कार पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, गबाजी वाकडकर संचालक प्रेरणा बँक यांना देण्यात आला व आदर्श माता पुरस्कार श्रीमती अश्विनी चिंचवडे, मा. नगरसेविका, श्रीमती. अलका लोंढे व सुनिता शिंदे यांना देण्यात आला.
या प्रसंगी आमदार सुनिल शेळके, आमदार शंकर जगताप, भाऊसाहेब भोईर श्री. नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, तुकाराम गुजर, मा. एकनाथ टिळे, मा. कांतीलाल गुजर मा. शेखर चिंचवडे, अजिंक्य टिळे असे मान्यवर तसेच परिसरातील नागरीक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानपत्र वाचन नाना शिवले (सर) यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सचिन वाल्हेकर व आभार प्रदर्शन गाडेकर यांनी केले.