
पुणे – भारत विकास परिषद (मध्य पुणे) – सारसबाग शाखेच्या वतीने १४ जून २०२५ रोजी वृक्षवाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम सारसबागेतील धबधबा समोर सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात वृक्षप्रेमी रघुनाथजी ढोले (संस्थापक – देवराई फाउंडेशन, पुणे) यांच्या शुभहस्ते वृक्षवाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व तसेच योग्य प्रकारे झाडे लावण्याची आणि त्यांची निगा राखण्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घेतला.
या उपक्रमात अनेक सदस्य व त्यांचे मित्रमैत्रिणी मोठ्या संख्येने सहभागी झाले. निसर्गसंवर्धनाची जाण व वृक्षप्रेम जागवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले:
माधवरावजी चिरमे – मुख्य आधारस्तंभ
दिपकजी पुजारी – प्रांत सहसचिव
शिवाजीरावजी भागवत – प्रमुख नेते
चंद्रशेखरजी भिंगारकर – अध्यक्ष
सुधीरजी लडकत – सचिव
सुरेशजी खांडरे – खजिनदार
कार्यक्रमाचे आयोजन सुरळीतपणे पार पडल्याबद्दल सर्व आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.