पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. सभेनंतर त्यांनी १५ मिनिटे पाच मान्यवरांसाठी राखून ठेवली होती, ज्यात महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष आणि हिंदी प्रचारक जयराम फगरे (वय ९४) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सन्मान केला. तर एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांनी ‘एकता’ मासिकाचा दिवाळी अंक मोदी यांना प्रदान केला.
फगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांदीचे सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, आणि शाल प्रदान केली. त्यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारताना मोदींनी फगरे यांच्या हिंदी प्रचारासाठीच्या कार्याचे कौतुक केले. नरेंद्र मोदी हिंदी भाषेचे दूत म्हणून सर्वत्र हिंदीतून संवाद साधतात, यामुळे फगरे यांना त्यांचा सत्कार करण्याची फार इच्छा होती.
फगरे यांची पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा एकता मासिकाच्या सप्टेंबर अंकात संपादिका रुपाली भुसारी यांनी मांडली होती. सदर लेख पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी लिहिला होता, तर सन्मानचिन्हावरील मजकूर आकाशवाणीचे डॉ. सुनील देवधर यांनी तयार केला होता.
खा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने ही भेट निश्चित करण्यात आली होती. भेटीदरम्यान, देवधर यांनी पंतप्रधानांना पुस्तके तर रुपाली भुसारी यांनी एकता मासिकाचा दिवाळी अंक प्रदान केला. मोदींनी एकता मासिकाच्या जुन्या परंपरेचे स्मरण करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.
९४ वर्षीय जयराम फगरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधण्याचे भाग्य लाभले, ज्यामुळे त्यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. खा. मेधा कुलकर्णी यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा योग साधल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांच्या आठवणीत भर टाकणारी घटना ठरली.