
पुणे: मावळ तालुक्यातल्या शिरगाव येथील शारदाआश्रम प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आता विज्ञानाचे धडे प्रात्यक्षिक स्वरूपात गिरवणार आहेत.या आश्रम शाळेत हेन्कल कंपनीच्या सीएसआर निधीतून “रिसर्चरस वर्ल्ड ” या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतातील पहिले वैज्ञानिक प्रशिक्षण उभारले असुन यासाठी कंपनीचे वीस लाख रुपये खर्च केले आहेत.वर्षभरात येथे मावळ तालुक्यातील ४० पेक्षा जास्त शाळांतील १५०० विद्यार्थी येथे १२ पर्यावरणपुरक प्रयोग करणार आहेत.यात प्रामुख्याने कागदाचा पुनर्वापर , टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनवने , उर्जा वाचवणे , पाण्याचा पुर्नवापर , चांगल्या खाण्याच्या सवयी आदी प्रयोग येथे केले जाणार असुन कंपनीतील मुंबई व पुणे येथील कंपनीचे अधिकारी हे विद्यार्थांना प्रशिक्षण देणार आहेत.
हेंकल ऍधेसिव टेक्नॉलॉजी इंडियाचे अध्यक्ष सुनील कुमार यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी शारदाआश्रम शाळेचे विश्वस्त माजी आमदार प्रकाश देवळे, हेंकल कंपनीच्या सीएसआर विभागाचे भुपेश सिंग,कुंजल पारेख,डॉ.प्रसाद खंडागळे,प्राचार्य प्रदिप लोखंडे उपस्थित होते.कंपनीचे अध्यक्ष सुनिल कुमार यांनी अभ्यासक्रमातील वैज्ञानिक प्रयोग ग्रामिण भागातील अनेक शाळांमध्ये केवळ लेखी स्वरूपात शिकवले जातात यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळत नाही.या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयोग शाळेची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
डॉ.प्रसाद खंडागळे यांनी प्रास्ताविकात कंपनीतर्फे आश्रमशाळेत सुरु असलेल्या आवकाश निरिक्षण केंद्र,करियर मार्गदर्शन,बोलकी शाळा,देशी झाडांची बँक,१५ केव्हीचा सौरउर्जा प्रकल्प,इ-लर्निंग,सांसकृतीक परंपरा जपण्यासाठी किर्तन महोत्सव ,पर्यावरणपुरक गणेश मुर्ती बनवण्याचे प्रशिक्षण आदी उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रकाश देवळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हेन्कल करत असलेल्या कार्यासाठी आभार मानले.
विद्यार्थ्यांनी प्रयोग करताना आलेले अनुभव यावेळी सांगितले.
कार्यक्रर्माचे सूत्रसंचालन दिपाली प्रजापती यांनी केले.नियोजन संतोष चव्हाण,किर्तीकुमार काटकर,प्रज्ञा कोंडुसकर,मनाली भोसले यांनी केले होते.