पुणे: नाटक,चित्रपट,आणि साहित्यिक कलावंतांच्या त्रिसूत्री संघटनातून होणारे परीवर्तन, संस्कृती,परंपरा आणि लोककलेचे जतन करते. कलासंवर्धनार्थ आयुष्य वेचलेल्या स्व.प्रमोद दामले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करणारा हा अद्वितीय सोहळा आहे.कर्तव्यनिष्ठा आणि कला यांचा सुरेख संगम या सोहळ्याने साधला आहे.आणि कलावंत म्हणून जगणे हाच आनंद असे प्रतिपादन, पद्मभूषण, मा. राजदत्त यांनी केले.
तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित नाट्य, ,कला, साहित्य क्षेत्रातील गुणवंत कलाकारांचा स्नेहमेळावा ,पद्मभूषण मा. राजदत्त*
(ज्येष्ठ दिग्दर्शक – चित्रपट, मालिका, माहितीपट, लघुपट आणि महानाट्य, चित्ररत्न, स्वातंत्र्य सैनिक),*मा. रजनी भट* (ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री.),
मा. दिलीप घारे,.प्रसिद्ध अभिनेते, (प्राध्यापक, नाट्य विभाग प्रमुख. सरस्वती भुवन महाविद्यालय,छत्रपती संभाजी नगर) *मा. कोटा नागुची जपान*, (“हॅपी सायन्स” राष्ट्रीय अध्यक्ष,जपान.,)
*मा.भाग्यश्री देसाई*,(प्रसिद्ध नाट्य,चित्रपट अभिनेत्री),
*मा. सतीश इंदापुरकर*(ज्येष्ठ दिग्दर्शक,साहित्यिक,कलावंत) आणि *मा.सुजीत दातार*, सोल्यूशनमाइंड
यांच्या प्रमुख उपस्थितीत , बालगंधर्व रंगमंदीर पुणे येथे नुकताच संपन्न झाला.
संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध नाट्यगीते, निवडक नाट्य प्रवेश, सादर करीत सोहळ्यास सुरुवात झाली.
कलाकारांनी संगीत रंगभूमीच्या आठवणींना उजाळा देत स्व.प्रमोद दामले यांच्या स्मृती जागृत केल्या.
स्व.प्रमोद दामले यांचा संपूर्ण जीवनप्रवास बालपणापासून तेअखेर पर्यंतचा कलाविष्कार या वेळी सादर झाला.
*तितिक्षा चित्र महर्षी* *जीवनगौरव पुरस्कार*
*मा. राजदत्त सर*
दत्तात्रय अंबादास मायाळू
यांना मानपत्र,सन्मानचिन्ह,पुणेरी पगडी,मानवस्त्र, अक्षरधन देऊन सन्मानीत करण्यात आले.
*तितिक्षा नाट्यशारदा जीवनगौरव पुरस्कार मा *. रजनी भट* प्रसिद्ध नाट्य ,चित्रपट अभिनेत्री यांना प्रदान करण्यात आला.त्यावेळी मा.राजश्री आठवले.,मा. जयमाला इनामदार,मा.क्षमा वैद्य,सोल्यूशनमाइंड चे सर्वेसर्वा मा *.सुजीत दातार उपस्थित होते.*
*तितिक्षा प्रमोद गौरव (स्व. प्रमोद दामले स्मृती) पुरस्कार*
मा. दिलीप घारे,.प्रसिद्ध अभिनेते, (प्राध्यापक, नाट्य विभाग प्रमुख. छत्रपती संभाजी नगर) यांना प्रदान करण्यात आला.
*मा.विजय सातपुते,मा.सुजित कदम,मा.गौरव पुंडे यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले*.
*तितिक्षाआरोग्यदूत स्व. डाॅ.मुकुंद खळदकर स्मृती पुरस्कार…..*
*मरणोत्तर..स्व. सुरेंन चव्हाण*
यांना देण्यात आला. डाॅ.चव्हाण कुटुंबीयांनी तो स्विकारला.
*डाॅ. स्वयंप्रभा मोहिते पाटील. अकलूज,
संजीवनी काळे,
शोभा रविंद्र धामस्कर,गोवा,
हेमलता गीते,अहमदनगर,
दुर्गा अभय भोर, भोसरी,
सोनाली सुजित कदम,पुणे,
सुलभा गोगरकर,अमरावती,
आम्रपाली उर्फ अमित मोहिते, यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले*.
*तितिक्षा हिरकणी पुरस्कार*
*संगीता राजपूत ठाणे* यांना देण्यात आला.
*तितिक्षा काव्य समर्पण *स्व. उर्मिलाताई कराड स्मृती* पुरस्कार…ज्येष्ठ कवयित्री.
*मा.मंदाताई नाईक* यांना प्रदान करण्यात आला.
दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाजलेली गाणी, यावेळी कलाकारांनी सादर केली.अगदी फिल्मफेअर पुरस्कारास शोभेल अशा पद्धतीने एकाहून एक सरस , उत्तमोत्तम कलाविष्कार या वेळी रंगमंचावर सादर झाले.
सलग सहा तास चाललेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
साहित्य, कला, शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यचित्रपट क्षेत्रातील कलावंत यांच्या कलासंवर्धनार्थ स्थापन झालेल्या तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यात अनेक दर्दी रसिक आवर्जून उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे अविस्मरणीय सूत्रसंचालन मा.अश्विनी दाशरथी यांनी केले. विजय सातपुते,सौ. शीला इंदापुरकर,दीपाराणी गोसावी,अजया मुळीक,अजिता मुळीक, पुरुषोत्तम कुंटे,गौरव पुंडे,योगेश हरणे,लक्ष्मण चव्हाण, साहिल मोरे यांनी सदर सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले.