पुणे: चुकीला एक वेळ माफी असू शकते परंतु गद्दारीला माफी नाही ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांना माफ केले जाणार नाही असे उद्गार शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काढले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे बोलत होते.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, सुलक्षणा शीलवंत या वाघीण आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत होता त्यावेळी भले भले मागे हटत होते परंतु ही वाघीण मैदानात उतरली. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा दाखला देत अमोल कोल्हे म्हणाले की सूर्य अस्ताला जात असताना प्रकाशाचे काय असा प्रश्न सूर्याला पडला होता त्यावेळी एक पंती पुढे आली व तिने अंधार दूर करता येतो हा विश्वास जगाला दिला त्याचप्रमाणे सुलक्षणा शीलवंत या विश्वास देणाऱ्या उमेदवार असल्याने आपले सर्वस्व पणाला लावून आपण त्यांना विजयी करावयाचे आहे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या एक उच्चशिक्षित उमेदवार आपल्याला मिळाले आहेत हे आपले भाग्य आहे. बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व सुलक्षणा शीलवंत यांनी केले तसेच मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या विरोधात निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व देखील सुलक्षणाशीलवंत यांनी केले त्याचवेळी महिलांच्या हक्कांसाठी व अधिकारासाठी सातत्यपूर्ण लढण्याची तयारी असलेले हे नेतृत्व आहे हे लक्षात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार सुलक्षणाशीलवंत असल्याने त्यांना निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
आज कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष मतदारांचा उत्साह आणि प्रेमाच्या वर्षावात पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुलक्षणा शीलवंत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची रॅली विजय निर्धाराची रॅली ठरली होती. यावेळी कार्यकर्ते दुचाकी व चार चाकी गाड्यांमधून महेश नगर, संत तुकाराम नगर येथून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत आले होते. सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांच्यात व मतदारांच्यात उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे हा उत्साह आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीतही दिसून आला. सुरुवातीला पिंपरी चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचंड घोषणा देत कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आले होते. रॅलीतील कार्यकर्त्यांच्या हातात शरद पवार साहेब, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आपचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांच्या प्रतिमा हातात घेऊन दिमाखात सहभागी झाले होते.
सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे,माजी नगरसेवक शंकर पांढरकर,
आप पक्षाच्या शहराध्यक्ष मीनाताई जावळे, चंद्रमनी जावळे,सुनील मोरे,सूरज मोरे,शरद जाधव,युवक अध्यक्ष इम्रान शेख,वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,नेते इखलास सय्यद,कार्याध्यक्ष विशाल काळभोर कार्याध्यक्ष संतोष कवडे ,ज्ञानेश आल्हाट,श्रीमंत जगताप ,दिलीप पानसरे ,जिब्राईल शेख ,संदीप चव्हाण,अनिल भोसले,योगेश सोनवणे,महेश पानस्कर,गिरीश कुटे, अतुल शितोळे,गोविंद अप्पा काळभोर,आपुलकी जेष्ठ नागरिक संघ,वसंत सोनार,फैज शेख,तृप्ती निंबळे,सागर लष्करे,अमोल गाडेकर,चेतन शेटे सूर्यवंशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे adv अमीन शेख,अण्णा कुऱ्हाडे, राहुल आहेर,संदीप गायकवाड ,कैलास बनसोडे, संदेश जगताप,राजेंद्र जगताप,हेमंत बलकवडे, श्रीकांत पवार उपस्थित होते.