
पुणे – भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता आज विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची 200 एकर ज़मिन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी सांगितले. पुणे येथील भिमाकोरेगाव येथील ऐतिहासीक विजय स्तंभास ना.रामदास आठवले यांनी 01 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विनम्र अभिवादन केले.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले बोलत होते.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे,सरचिटणीस गौतम सोनावणे,संघटन सचिव परशुराम वाडेकर,सुर्यकांत वाघमारे,बाळासाहेब जानराव शैलेश चव्हान,आशिष गांगुर्डे,मुंबईतुन आलेले प्रकाश जाधव ,सोहेल शेख, आदी अनेक मान्यंवर उपस्थित होते.
01 जानेवारी 1818 साली पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांन विरुध्द 500 शुरविर महार सैनिकांनी प्रचंड घनघोर युध्द केले. त्यात 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा तारुण पराभव केला. हे जगातल फार मोठ आश्चर्य असुन त्याबद्दल तत्काळीन ब्रिटीशांनी या भिमाकोरेगाव येथील या लढाईच्या स्मरणार्थ आणि महार सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गौरवासाठी येथे विजय स्तंभ उभारला. या ऐतिहासिक विजय स्तंभाला दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 01 जानेवारी रोजी भिमाकोरेगाव ला येऊन या ऐतिहासिक वियज स्तंभाला अभिवादन करुन आंबेडकरी समाजाला आपला गौरवशाली इतिहास हा लढाऊ योध्दयांचा गौरवशाली इतिहास असल्याचे आठवण करुन देत.आपल्या पराक्रमी पूर्वजापासुन प्रेरणा घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा उपदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर देत असत.तीच प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी आंबेडकरी जनता पुण्यातील भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास भेट देऊन अभिवादन करतात. या लढाईत शहिद झालेल्या शुरविर महार सैनिकांना विनम्र अभिवादन करतात.