
पुणे: दिघी येथील भीमाशंकर नगरमधील महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासन-आदिवासी सेवक पुरस्कार विजेत्या सौ. सिताबाई किर्वे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषा वाळके, पुष्पा सुपे, विद्या बनसोडे, मेघा मोहरे, आणि आशा विरणक या मान्यवरांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाचे आयोजन कमल विरणक, मंगल लांडे, सुशीला गवारी, गंगुबाई शेळके, राधा किर्वे, सीता झांजरे, सकुबाई शेळके, अनिता शेळके, सुनिता शेळके, चिमाबाई करवंदे, उषा साबळे, आणि सुमन करवंदे या महिलांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या विचारांवर भाष्य करत महिलांनी सक्षम व स्वावलंबी बनावे, तसेच नवनवीन विचार आत्मसात करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी एकमेकांना लाडू भरवून कार्यक्रमाचा गोड शेवट केला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व व्यवस्थापन सामाजिक कार्यकर्ते रमेश विरणक (सर) यांच्या विशेष सहकार्याने पार पडले.