
पुणे: भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या “सदस्यता नोंदणी अभियान” अंतर्गत पिंपरीतील नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळाला. २०४७ पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
शगुन चौक आणि झुलेलाल चौक येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत, राष्ट्रनिर्मितीच्या या ऐतिहासिक मोहिमेचा भाग बनण्याचे आवाहन केले. प्रत्येक बूथवर नागरिकांसाठी सदस्यता नोंदणी प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.
या अभियानादरम्यान भाजपाचे जयेश चौधरी यांच्यासहित गणेश वाळुंजकर, गणेश ढाकणे, संजय मंगोडेकर, शकुंतला चौधरी, हनुमंता घुगे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी पक्षाच्या विचारसरणी, उद्दिष्टे, तसेच भविष्यातील योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. नागरिकांनीही पक्षाच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राष्ट्रहिताच्या या मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
भारतीय जनता पार्टीच्या या उपक्रमामुळे पिंपरी परिसरात राष्ट्रवादाचा जोश निर्माण झाला असून, नागरिकांचा पाठिंबा पाहता हे अभियान अत्यंत यशस्वी होणार असल्याचे दिसून येत आहे.