
Views: 69
Read Time:1 Minute, 16 Second
पुणे: पुणे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे शहरातील विकासकामे किंवा प्रभागातील मूलभूत कामे ठप्प झाली होती. ती लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावीत. त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, विद्युत खांब बसविणे, ड्रेनेज, पाणी पुरवठा, विविध रस्ते, वाहतुकीचे प्रश्न यांसह विविध प्रमुख विभागामध्ये असलेली नागरिकांची दैनंदिन कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा.आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे संबधित विभाग प्रमुखांना निर्देश दिले.