Skip to content
July 8, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Reporter News

Reporter News

Today's News Tomorrow's Future

Primary Menu
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Live
  • Home
  • पिंपरीकरांचा विश्वास कायम; पुन्हा संधी मिळेल याची खात्री – अण्णा बनसोडे
  • Marathi News

पिंपरीकरांचा विश्वास कायम; पुन्हा संधी मिळेल याची खात्री – अण्णा बनसोडे

admin November 1, 2024
पिंपरीकरांचा विश्वास कायम; पुन्हा संधी मिळेल याची खात्री – अण्णा बनसोडे
Views: 218
0 0
Spread the love
           

Read Time:5 Minute, 2 Second

पुणे: पिंपरी मधील जनतेने मला कायम साथ दिली आहे. या विश्वासामुळेच आजवर नगरसेवक तसेच आमदार म्हणून चांगले काम करू शकलो. अनेक कामे पुढील काळात पूर्णत्वास न्यायची आहेत. त्यासाठी देखील पिंपरीतील मतदार राजा मला पुन्हा संधी देईल, असा विश्वास महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.

 

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आरपीआय (आठवले) पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना आमदार अण्णा बनसोडे बोलत होते.

 

यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, दयानंद वाघमारे, बाबा सरोदे, ऍड गोरक्ष लोखंडे, नंदा खोचर, अंकुश कानडे, रामचंद्र माने, ईला ठोसर, लता ओव्हाळ, सम्राट जकाते, योगेश भोसले, अक्षय दुनगव, संजय सरोदे, दिलीप थोरात, दिनकर मस्के, संभाजी वाघमारे, बंडू वाघमारे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, मी सन 1997 मध्ये आनंदनगर मधून पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली. जनतेने मला चांगली साथ दिली. त्यानंतर महापालिका आणि विधानसभा अशा निवडणुका लढविल्या. तेव्हा देखील जनतेने वेळोवेळी मला चांगली साथ दिली आहे. या विश्वासामुळे मी आजवर चांगले काम करू शकलो.

 

सर्वांना हक्काचे चांगले घर मिळेल

 

अजंठानगर, दळवीनगर झोपडपट्ट्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जात आहे. सुरुवातीला यात आनंदनगर झोपडपट्टीचा समावेश नव्हता. आपण त्यामध्ये आग्रही भूमिका घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात आनंदनगरचा समावेश केला. आनंदनगरच्या बाबतीत अनेकांना घर मिळणार नाही. प्रकल्प रद्द होईल, अशी भीती घातली जात होती. पण तसे होणार नाही. प्रत्येकाला चांगले घर मिळेल. यासह पत्राशेड, लिंकरोड, दापोडी, फुलेनगर येथेही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

 

महापालिका निवडणुकीत आरपीआयचे बळ वाढणार

 

आरपीआय शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आरपीआयची आपल्याला कायम मदत झाली आहे. त्यामुळे या मदतीचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. या शब्दात अण्णा बनसोडे यांनी आरपीआय बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

 

शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवारांचे काम करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आरपीआयचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जोमाने काम करत आहे. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे यांच्या रूपाने आपले नेतृत्व पुन्हा विधिमंडळात पाठवायचे आहे.

 

बाळासाहेब भागवत म्हणाले, पक्षातील फितुरी बाबत रामदास आठवले यांच्याशी चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आरपीआय हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे. जे काम करणार नाहीत त्यांची यादी रामदास आठवले यांनी मागितली आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय आठवले यांच्याकडून घेतला जाणार आहे. अण्णा बनसोडे हे तळागाळात राहून काम करणारे नेते आहेत. प्रत्येकाशी आपुलकीने बोलून ते नागरिकांची कामे मार्गी लावतात. त्यामुळे हेच नेतृत्व पुन्हा विधानसभेत पाठवायचे असल्याचेही भागवत म्हणाले..

Share

Pinterest
LinkedIn
Avatar

About Post Author

admin

https://reportertodaynews.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %

Spread the love
           

Continue Reading

Previous: AB फॉर्म(A फॉर अजित B फॉर बारामती ) अजित पवारांकडं असला तरी मूळ 7-12 अजूनही शरद पवारांकडे आहे…वाचा अद्वैत मेहता यांचा लेख
Next: पिंपरी मतदार संघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील – खासदार निलेश लंके

Related Stories

CIO (चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन) च्या पर्यावरण मोहिमेचा पुण्यात उत्साहात शुभारंभ
  • Marathi News

CIO (चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन) च्या पर्यावरण मोहिमेचा पुण्यात उत्साहात शुभारंभ

admin July 7, 2025
  • Marathi News

“संविधान दिंडी”च्या माध्यमातून संविधान जागृतीचा अभिनव उपक्रम — बार्टीचा आळंदी ते पंढरपूर दरम्यान उपक्रम

admin July 1, 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी
  • Marathi News

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

admin July 1, 2025

Recent Posts

  • CIO (चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन) च्या पर्यावरण मोहिमेचा पुण्यात उत्साहात शुभारंभ
  • BRIDGING FORCES: CME Pune Hosts Integrated Symposium on Military-Civil Synergy in National Disaster Management
  • Marine Engineering Course Concludes at INS Shivaji; International Trainees Excel
  • Vfhjn
  • “संविधान दिंडी”च्या माध्यमातून संविधान जागृतीचा अभिनव उपक्रम — बार्टीचा आळंदी ते पंढरपूर दरम्यान उपक्रम

Recent Comments

  1. internetomskHeilk on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  2. internetHeilk on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  3. vivodcherepovecProrm on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  4. MarcoJoutt on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  5. ArturoMut on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर

Archives

  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • Bangali News
  • Contact Us
  • Defence News
  • English News
  • Hindi News
  • Kannada News
  • Marathi News
  • News
  • Uncategorized

You may have missed

CIO (चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन) च्या पर्यावरण मोहिमेचा पुण्यात उत्साहात शुभारंभ
  • Marathi News

CIO (चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन) च्या पर्यावरण मोहिमेचा पुण्यात उत्साहात शुभारंभ

admin July 7, 2025
BRIDGING FORCES: CME Pune Hosts Integrated Symposium on Military-Civil Synergy in National Disaster Management
  • English News

BRIDGING FORCES: CME Pune Hosts Integrated Symposium on Military-Civil Synergy in National Disaster Management

admin July 4, 2025
Marine Engineering Course Concludes at INS Shivaji; International Trainees Excel
  • English News

Marine Engineering Course Concludes at INS Shivaji; International Trainees Excel

admin July 1, 2025
Vfhjn
  • Uncategorized

Vfhjn

admin July 1, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.