
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत RTE मदत केंद्राच्या माध्यमातून पालकांना मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
RTE कायदा आणि त्याचे फायदे:
शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE) अंतर्गत, पहिली ते आठवीपर्यंत खाजगी इंग्रजी माध्यम तसेच सेमी-इंग्रजी शाळांमध्ये लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो.
कोणते विद्यार्थी पात्र?
1. सामाजिक मागास गट: SC, ST, OBC, NT, VJNT, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी
2. आर्थिक दृष्ट्या मागास: वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी
3. अनाथ बालक: अनाथाश्रमात राहणारे किंवा दत्तक घेतलेले
4. दिव्यांग विद्यार्थी: किमान 40% अपंगत्व असलेले
5. एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित विद्यार्थी
6. घटस्फोटित महिला पालकांची मुले
आवश्यक कागदपत्रे:
1. जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला किंवा प्रतिज्ञापत्र)
2. जातीचा दाखला (सामाजिक मागासांसाठी)
3. उत्पन्नाचा दाखला (आर्थिक मागासांसाठी)
4. रहिवासी पुरावा (रेशनिंग कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक इत्यादी)
5. दिव्यांग प्रमाणपत्र
6. एचआयव्ही संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र
7. अनाथ बालकांसाठी अनाथालयाच्या कागदपत्रांची आवश्यकता
वयोगट:
प्ले ग्रुप/नर्सरी: 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान जन्मलेली मुले
ज्युनिअर केजी: 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021
सिनिअर केजी: 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020
इयत्ता 1 ली: 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019
मदत केंद्र संपर्क:
बार्टीच्या समतादूतांमार्फत मोफत अर्ज सेवा उपलब्ध आहे.
उषा कांबळे (पुणे शहर): 8605101732
तेजस्विनी कांबळे (पुणे शहर): 7666003409
अनिता दहीकांबळे (हडपसर/हवेली): 9552955620
प्रशांत कुलकर्णी (पिंपरी चिंचवड): 9371215013
भारती अवघडे (देहूरोड/पुणे): 8485800516
शशिकांत जाधव (निगडी/खेड): 8483817269
पालकांनी वरील मदत केंद्रांशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करावी.