
पुणे: प्रा.देवदत्त पाठक संशोधित शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास अंतर्गत गेल्या ३८वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील या पुरस्कार वितरणामध्ये यावर्षी एस एन टी कन्या शाळा, माटे हायस्कूल ,तसेच ज्ञानदा प्रशाला या शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षीचा कुमार रंगकर्मी पुरस्कार दिला गेला. रंगमंच खेळातून ८० तासिकांच्या माध्यमातून मुलांचे व्यक्तिमत्व व क्षमताविकसन आणि कलात्मक अभिव्यक्ती यातील सर्वोत्तम प्रगती दाखवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यानां सर्वोत्कृष्ट कुमार रंगकर्मी पुरस्कार दिला जातो. यावर्षी तो आर्यन तोलनूर अदिती पोपलभट,रिया येरडकर ,खुशी घोलप ,प्रतीक चव्हाण अनन्या जगताप यांना अनुक्रमे ज्ञानदा प्रशाला किरकट वाडी एसएनडीटी कन्या शाळा पुणे , व्ही के माटे हायस्कूल चिंचवड या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आला. गुरुस्कूल फाउंडेशन गुफान तसंच रोटरी क्लब पुणे च्या सहकार्याने अमित भदे ,हेमंत जेरे ,दीपा पानसे, प्राजक्ता जेरे ,लिंबराज खुने ,दीपक परदेशी ,देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या हस्ते देण्यात आला.
कुमार रंगकर्मी पुरस्काराचे हे पंचविसावे वर्ष आहे १९८७ पासून सुरू असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास च्या अंतर्गत ३७१ शाळांचा यामध्ये आजपर्यंत सहभाग आहे.
नाटकाच्या तासांअंतर्गत कुमार रंगकर्मी पुरस्कार
प्राध्यापक देवदत्त पाठक संशोधित १९८७ सालापासून सुरू असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास हा एक अर्थाने मुलांचे व्यक्तिमत्व विकसन, क्षमता विकसन, कला विकसन,वागणं ,बोलणं ,चालणं ,बघणं हालचाली करणे ,कृती करणे सुसंवाद,याला प्रभावी व उठाव देत आहेत.
रंगमंच खेळांच्याद्वारे नाटकाच्या तासामध्ये मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमात शास्त्र, गणित ,भाषा याबरोबरच नाटकाचा तास गेली अनेक वर्ष नित्यनेमाने होत असतो. यामध्ये आजपर्यंत ३७१शाळांचा समावेश आहे, दरवर्षी नवीन तीन ते चार शाळा यांचा यामध्ये सहभाग असतो, यामध्ये स्वतः प्राध्यापक देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर आणि त्यांचे विद्यार्थी सहकारी हे शाळेत जाऊन नाटकाचा तास आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घेतात, एकूण ८०तासिकांचं आयोजन असते, यामध्ये अभिव्यक्तीचे प्रशिक्षण यावरती भर दिला जातो ,त्याच्या अंतर्गत सकारात्मक,मन ,बुद्धी आणि शरीर याला सक्रिय करणारे रंगमंच खेळ घेतले जातात ,याच्यामध्ये स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती, कल्पनाशक्ती, विचार शक्ती आणि कृतिशक्ती याला आव्हान दिले जाते.त्यातूनच मुले हळूहळू तयार होतात स्वतःची विचार आणि कल्पना प्रत्यक्ष कृतीतून प्रसंगातून घटनेतून छोट्याशा नातटूकल्यातून मांडू पाहतात आणि वर्षाच्या शेवटी एकूण सगळे तास झाल्यानंतर ही सर्व मुलं त्याचा प्रात्यक्षिक प्रयोग सादर करतात त्या प्रयोगाच्या अंतर्गत त्यांनी केलेल्या विचार कल्पनांना नाट्यरूप त्यांनी स्वतःच दिलेल्या असते हे यातले वैशिष्ट्य ,ही मुले उत्तम नागरिक तर बनतीलच त्याचबरोबर उत्तम प्रेक्षकही बनतील आणि त्यातलाच एखादा चुणचुनीत हुशार मुलगा पुढे आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं करिअर बनवू शकतो, यामध्ये प्रसाद ओक,आशुतोष कुलकर्णी,उपेंद्र सिधये, सुश्रुत भागवत, दीप्ती श्रीकांत, चैतन्य थरकुडे,गौरव पोळ,रवींद्र सातपुते, यतीन माझीरे अथर्व सुदामे ,आर्यक पाठक, वैभव वाघ, नेहा कुलकर्णी अशी असंख्य नावें घेता येतील
नाटकाच्या तासांतर्गत अनेक शाळा यासाठी मदत करत असतात ,आता तर नाटकाचा तास सर्व शाळांमध्ये बंधनकारक होत आहे ही आनंदाची बाब.
नाटक जगण्यातला आनंद शोधायला शिकवते तसेच अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वागायलाही शिकवत असं मत या नाटकाच्या तासाचे संशोधक आणि संकल्पक प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी मांडले आहे.
या प्रकल्प अंतर्गत गेली 25 वर्षे अनेक शाळांमधून सर्वोत्तम कुमार रंगकर्मी पुरस्कार दिले जातात, यावर्षी हे पुरस्कार आर्यन तोलनूर, अदिती पोपलभट,, रिया येरडकर ,खुशी घोलप, प्रतीक चव्हाण, अनन्या जगताप..असे या वर्षीचे ज्ञानदा प्रशाला, किरकटवाडी, पुणे, एस. एन.डी. टी. कन्या शाळा पुणे. वि.के.माटे हायस्कूल चिंचवड येथील कुमार विद्यार्थ्यांना विशेष रंगकर्मी पुरस्कार देण्यात आले आहेत,रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण च्या विशेष सहकार्याने यावर्षीचा शाळेच्या वेळात अभ्यासक्रमात नाटकाचा तास हेमंत जेरे अमित भदे दीपा पानसे आणि प्राजक्ता जेरे यांच्याबरोबरच विजयश्री महाडिक माया कोथळीकर दीपक परदेशी, लिंबराज खूने यांच्या सहकार्याने संपन्न झाला.