
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कर्वेनगर व केशव माधव न्यास तर्फे वरवंड तालुका दौंड येथील निवासी आश्रम असलेल्या सेवा प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली.श्री रासाईदेवी निवासी प्राथमिक आश्रमशाळे मध्ये पहिली ते सातवी इयत्तीपर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकत आहेत.ही आश्रमशाळा निवासी असल्याने ह्यांना मदत म्हणून त्यांना लागणारा मोठा इंडस्ट्रिअल मिक्सर केशव माधव न्यास तर्फे देण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १२ जानेवारी ते १९ जानेवारी ह्या कालावधीमध्ये सेवा सप्ताह निमित्त विविध सेवा प्रकल्पास भेट कार्यक्रम करीत आहे यात सेवा विषयक प्रकल्पाची माहिती करून घेणे त्यांना मदत करणे,समाजासाठी काम करणाऱ्या विविध सेवा भावी संस्थांना भेट देणे.संस्था स्थापन करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेणे असे कार्यक्रम घेत आहेत.
याचाच एक भाग म्हणून वरवंड गावातील या आश्रम शाळेस भेट देऊन तेथे राबविण्यात येणारे सर्व प्रकल्पाची पाहणी केली.
मकरसंक्रांत निमित्त सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीळ गुळ वाटप या वेळी करण्यात आले.विद्यार्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र ची माहिती असलेली पुस्तिका देण्यात आली.तसेच देशभक्ती ची गाणी सादर करण्यात आली.
आश्रमशाळेच्या प्रांगणात झालेल्या ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व केशव माधव न्यास संस्थेच्या कार्याची माहिती सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे यांनी सेवा गीत सादर केले. एरंडवने भागाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकांत पुराणिक यांनी विद्यार्थ्यांसमोर बोध कथा सादर केली.केशव माधव न्यासचे कांचन दाते यांनी गो-सेवा कार्याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दूरदर्शन कलाकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले.विद्यार्थ्यांतर्फे ज्ञानेश्वर शिंदे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गीत सादर केले.तर प्रकल्प प्रमुख प्रमोद कुलकर्णी यांनी आभार मानले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वयंसेवक व दीनदयाळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी शेणोलीकर हे होते.संस्थेचे कार्याध्यक्ष तानाजी दिवेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.संस्थेतर्फे असणारे सर्व प्रकल्प प्रत्यक्ष दाखवले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रामदास शितोळे यांनी केशव माधव न्यासचे आभार मानले तसेच उल्हासराव सावळेकर यांचा दत्ताजी शेणोलीकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आश्रमशाळेचे संदीप काकडे,रवींद्र भोसले,रुपाली रणदिवे,दादाराम खेतनाळे,कविता काकडे, दिलाबाई लांडगे,सुनील खंडाळे यांचेसह
कर्वेनगर येथील एकूण १७ स्वयंसेवक,केशव माधव न्यासचे कार्यकर्ते उपस्थित होते.सामूहिक वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.