
पुणे: शाळा – भुमकर वस्ती, मुले, क्र.१०४ बालवाडी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्यातून महाराष्ट्र संस्कृतीचे नयनरम्य दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली .
कलाविष्कार कार्यक्रमासाठी मा. मोहनदादा भुमकर व मा . मिनाताई मोहनदादा भुमकर हे मान्यवर उपस्थित होते . शाळेच्या मा .पर्यवेक्षिका अरुणा महानवर मॅडम यांनी ही उपस्थित राहून विद्यार्थांच्या कलागुणांचे कौतुक केले .
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. राजेश भांडवले व उपाध्यक्ष मा. आळसे मॅडम तसेच समिती सदस्यही उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ग्रामस्थ व पालक वर्गही बहुसंख्येने उपस्थित होता .
प्रास्ताविकतेतून शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुनंदा कोंडे मॅडम यांनी शाळेची प्रगती व सहकार्य करणारा शिक्षकवर्ग यांचे कौतुक केले.
मान्यवरांनी कलाविष्कारातील कलाकारांना रोख रक्कम बक्षीस देऊन कौतुक केले.
माऊली नृत्य, चेअर डान्स ,हळूच या हो हळूच या आकर्षक ठरले . जलवा
गॉड अल्ला भगवान , कन्धे से मिलते है कन्धे ,ए वतन ए वतन देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले .
दैवत छत्रपती, चाकर शिवबाचे होणार ऐतिहासिक व काठीनं
घोंगडं घेऊ द्या की रं जोशपूर्ण नृत्ये सादर केली .
तसेच झाडे लावा झाडे जगवा ही नाटिका ही सुंदर सादर करण्यात आल्या .
विजया गावडे पूनम खामकर कविता देशमुख अनिता गेंगजे अभिजीत वैरागर दिपरत्ना धाकडे मिलिंदकुमार पाटील मोहिनी जगताप मनिषा भिकाने उज्वला चव्हाण प्रशांत शिरले मयुरी लकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला राजे यांनी केले . तर आभार राजश्री रासकर यांनी मानले .