
पुणे: मॉडर्न एज्युकेशन सोसायटी चे नेस वाडिया कॅालेज ओफ कॅामर्स , पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धे मध्ये नुमवि कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. नूमवी कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक* आलेला असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वाणिज्य शाखेचे प्राध्यापक रमेश विरनक सर यांनी केले होते.
या स्पर्धेसाठी नेस वाडिया कॅालेच्या प्राचार्या सौ. वृषाली रंधीर मॅडम , उपप्राचार्य डॅा. प्रकाश चौधरी सर , नेस वाडिया कॅालेचा माजीविद्यार्थी अभिनेता रोहीत हिंजनवारे , प्रो.राहुल मोरे सर ,आदी. मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते…..व तसेच आगामी येनारा मराठी चित्रपट “इलुइलु“ टिम उपस्थित होती…….सदर स्पर्धेमध्ये नेस वाडिया कॉलेज, सिंहगड कॉलेज, डि.वाय. पाटिल कॅालेज पिंपरी ,क्राईस कॅालेज वडगावशेरी ,मॉर्डन कॉलेज, व इतर महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
पथनाट्याचा विषय होता “उज्वल भारताचे उज्वल भवितव्य”…. या नाटकामध्ये आजचे तरुण कशा प्रकारे वाईट मार्गाला जात आहे, व्यसनाच्या आहारी जात आहे शिक्षणापासून दूर होत आहे, व गुन्हेगारीच्या वाटेवर जात आहे. तसेच मोबाईचा जास्त वापर करत आहे
या सर्व वाईट गोष्टीमुळे आजचे तरुण आपले भवितव्य धोक्यात टाकत आहे. तर असे न करता तरुणांनी महापुरुषांच्या विचाराची कास धरली पाहीजे व्यसनाधीन न होता योग्य आहार व व्यायाम केला पाहिजे व शिक्षण घेऊन आपल उज्वल भवितव्य घडवल पाहिजे अशा सर्व बाबी या पथनाट्यामध्ये दाखवल्या गेल्या आहेत.